पुणे

राजगुरुनगर : खा. कोल्हे यांचे हिंदुत्व बेगडी : आढळराव पाटील

अमृता चौगुले

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा: हिंदुत्व आणि अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा बेगडीपणा असून, हिंदुधर्माचे नाव घेण्याचा कोल्हेंना अधिकार नसल्याची टीका शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली. खेड पंचायत समितीच्या इमारतकामाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (दि. 16) राजगुरुनगर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आढळराव पाटील बोलत होते.

पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, उपसभापती ज्योती अरगडे उपस्थित होते. एखाद्या धर्माला खूष करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका दाखवली. आता 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटच्या आडून हिंदुत्व दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदुत्वाच्या आडून चाललेला नौटंकीपणा सर्वच पक्षांना आणि जनतेला माहिती आहे. तुम्ही कुणालाही खूष करण्याचा प्रयत्न करून आणाभाका घेतल्या, तरी तुमची गोडसे आणि औरंगजेबाची भूमिका असून, यातून आपला दुटप्पीपणाचा भूमिका समोर आला आहे. त्यामुळे कोल्हेंच्या तोंडून हिंदुत्व शोभत नसल्याचा गंभीर आरोप आढळराव पाटील यांनी केला.

…तर महेश लांडगे यांचा प्रचार करू
शिरूर मतदारसंघात भाजपचे अभियान सुरू असून, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार देणार, असे बोलले जात आहे. यावर बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, माझा आणि महेश लांडगे यांचा पक्ष एकत्र आहे. भविष्यात महेश लांडगे संगनमताने जर उमेदवार असतील, तर मी त्यांचा प्रचार करणार आहे.

SCROLL FOR NEXT