पुणे

Pune : गुंड गजानन मारणे, पार्थ पवारांची भेट

अमृता चौगुले

पुणे : कोथरूडमध्ये दहशत असलेला गुंड गजानन ऊर्फ गज्या मारणे आणि पार्थ पवार यांची मारणे याच्या घरी भेट झाली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मारणेविरुद्ध खून, खुनाची धमकी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मारणे टोळीची कोथरूड तसेच शहरात दहशत आहे. कारागृहातून सुटल्यानंतर काढलेल्या रॅलीमुळे गजानन मारणे पुन्हा चर्चेत आला होता. त्यानंतर रॅलीत सहभागी झाल्याने त्याच्यावर व इतरांवर कारवाईदेखील करण्यात आली होती.

मारणेची पत्नी जयश्री या मनसेच्या नगरसेविका होत्या. मारणेने पार्थ पवार यांची भेट घेतल्याचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मारणे आणि त्याची पत्नी जयश्री उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक दत्ता धनकवडे, प्रदीप देशमुख उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मारणे याच्या भेटीमुळे कोथरूडमधील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत आहेत.

पुण्यातील टोळीयुद्ध गेल्या काही वर्षांपासून शांत झाले होते. परंतु, गँगस्टर शरद मोहोळ याच्या खूनानंतर पुन्हा भडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तत्पुर्वी पुण्यातील गुन्हेगारीवर पोलिस वचक बसविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांचा माहोल सुरू झाला आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आपला कोण अन कोणाला सोबत घेता येईल, हे पाहत असल्याचे दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT