खेड शिवापूर: शुक्रवारी (दि. १६ ) पहाटेच्या सुमारास लॉन्ड्री संघटनेचे पुणे जिल्हा संघटक प्रमोद गायकवाड यांच्या लॉन्ड्री दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुकानातील लोखंडी वस्तू सोडली तर इतर सर्व कपड्यांची राख झाल्याचे दिसून आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
दरम्यान दुकानाशेजारी राहणारे जितेंद्र सुर्वे हे पहाटे ५ वाजता बांधकामाला पाणी मारण्यासाठी आले असता आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ गायकवाड यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अवघ्या २०-२५ मिनिटात अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. प्रारंभी गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने येऊन आग आटोक्यात आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्र रूप धारण केले असल्याने सर्व प्रयत्न अपुरे पडले. या आगीमुळे दुकानातील स