Khed Heavy Rain Pudhari
पुणे

Khed Heavy Rain: खेड तालुक्यात पावसाचा कहर! पाझर तलाव फुटला, पूल वाहून गेले; अनेक गावांचा संपर्क तुटला

पाईट परिसरात अतिवृष्टीचा मोठा फटका; रस्ते पाण्याखाली, वीज डीपी वाहून गेली

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: खेड तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यासह अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

पाईट (ता. खेड) येथील गावठाणचे पश्चिमेस असलेला पाझर तलाव हा मंगळवारी (दि. ७) रात्रीचे अतिवृष्टीमुळे फुटला आहे. परिणामी अहिरे-पराळ गावचा संपर्क तुटला आहे आणि तेथील एक विजेची डीपी वाहून गेली आहे. त्याचप्रमाणे पाईट-रौंधळवाडीचा पुलाचा काही भाग वाहून गेला आहे.

यासह तालुक्यातील गुंडाळवाडी येथील पुलावर पाणी आहे. शिरगाव येथील नेकलेस धबधब्याजवळ टेकडीचा काही भाग तुटून रस्त्यावर आला आहे. कडूस-गारगोटवाडीच्या दरम्यान असलेला (कारामळी) पुल रात्री पावसामुळे वाहून गेला आहे. तसेच कडूस-खेड पुलावरून पाणी आल्याने कडूस गावाचा संपर्क तुटला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT