पुणे

खंडोबाच्या पगडीची सांगली जिल्ह्यातून रथयात्रा निघणार

अमृता चौगुले

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  सांगली जिल्हा श्री मल्हारी मार्तंड रथयात्रा मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदाच 'श्री मल्हारी मार्तंड दर्शन रथयात्रे'चे आयोजन शुक्रवार, दि. 8 ते रविवार, दि. 17 डिसेंबर असे 10 दिवस करण्यात आले आहे. या रथयात्रेत महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या श्री खंडोबा देवाची पगडी/ फेटा दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. जेजुरीच्या श्रीखंडोबा देवाची पगडी/ फेटा या रथयात्रेत ठेवून संपूर्ण सांगली जिल्ह्यातील एकूण 8 तालुक्यांमधील 80 गावांमध्ये नेण्यात येणार आहे. समाजामध्ये धार्मिक एकीची भावना वाढावी, श्री खंडेरायाचे दर्शन प्रत्येक भाविकाला व्हावे, श्रद्धाभाव जागृत व्हावा हा या रथयात्रेचा मुख्य हेतू आहे.

सांगली जिल्हा श्री मल्हारी मार्तंड रथयात्रा मंडळ यांच्याकडून श्री खंडोबा भैरवनाथ महाराजांची पगडी ही रथयात्रेसाठी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीनुसार सर्व विश्वस्तांच्या सहमतीने श्री मल्हारी मार्तंड रथयात्रेनिमित्त पगडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी (दि. 7) श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी न्यासाचे विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वास पानसे यांच्या हस्ते खंडोबा मंदिरामधून श्रींच्या पगडीची विधिवत पूजा, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर रात्री पगडी काचेच्या बॉक्समधून रथयात्रेसाठी नेण्यात आली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT