Summary
श्री शिवशंभू विचार मंचची मागणी
सरकारला ही जाब विचारणार
न्यायालयात याचिका दाखल करणार
पुणे : 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर पाहण्यात आला. यामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या अनेक चुकीचे आणि खोटे दावे करण्यात आलेले आहेत. शासनाने या चित्रपटावर बंदी घालावी तसेच याबाबत सरकारला ही विचारणा करणार असल्याची माहिती अखिल भारतीय पंच रामनदी निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीर दास महाराज, शिवशंभू विचार मंचाचे राज्य संयोजक सुधीर थोरात आणि व्याख्याते सौरभ कर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Latest News)
याबाबत सुधीर दास महाराज म्हणाले या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुसलमान होते, महाराजांचे ३५ पैकी ११ अंगरक्षक मुसलमान होते आणि महाराजांनी रायगड किल्ल्यावर मशिद बांधली असे चुकीचे दाखले देण्यात आलेले आहेत. शासनाने अशा चित्रपटावर बंदी घालावी तसेच याविरोधात न्यायालयात याचिका ही दाखल करणार आहे.
थोरात म्हणाले, या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या दुष्यंना पुष्टी करणारे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे चित्रपटाचे निमति आणि दिग्दर्शकांनी सदर संदर्भ आणि पुरावे दिल्याशिवाय शासनाने हा चित्रपट प्रसारित करू नये चित्रपटाच्या ट्रेलरमधेच इतके दोष असतील तर संपूर्ण चित्रपट हा समाजाची वैचारिक दिशाभूल करणारा असेल, नवीन पिढ्यांमध्ये इतिहासाबद्दल गैरसमज निर्माण करेल. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी खरे योगदान आणि बलिदान देणाऱ्या मावळ्यांचे श्रेय दुसऱ्याच कुणाला तरी देण्याचा हा विश्वातक प्रयत्न असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.
सुधीर दास महाराज म्हणाले, रायगड किल्ल्याची जागतिक वारसा स्थळात नोंद झाली आहे. त्या स्थळाबाबत अत्यंत चुकीचा संभ्रम चित्रपट माध्यम व समाज माध्यम याबर पसरविण्याचे हे पूर्वनियोजित षडयंत्र आहे. त्यामुळे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. त्याचबरोबर शासनाच्या सांस्कृतिक विभागाने हा चित्रपट पुरस्कारासाठी पाठवला असेल तर त्याबाबत ही सरकारला नक्कीच विचारणा करू असे ही त्यांनी यावेळी सांगितले.