खडकवासला : खडकवासला धरण तीरावर ग्रीन थंब संस्थेच्या वतीने लोकसहभागातून स्थानिक भूमिपुत्रांसाठी तयार केलेले दहा किलोमीटर अंतराचे शेत रस्ते तसेच फळबागा, वनराईतील बहरलेली गर्द झाडी पाहून दिल्लीच्या पाहुण्यांसह सिंहगड, पानशेत भागातील नागरिक भारावून गेले.
दिल्लीतील टाटा लॅक्सी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सार्थ नायर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, परिसरातील नागरिकांनी सोमवारी (दि. 17) खानापूर, गोऱ्हे खुर्दमध्ये धरणातून काढण्यात आलेल्या गाळावर शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात आलेल्या शेतरस्ते, फळबागा, वनराई आदी नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली.
खानापूरमधील मांडवी स्टॉप ते गोऱ्हे खुर्दपर्यंतच्या धरण तीरावरील पडीक दलदलीच्या ओसाड जागेवर धरणातून काढण्यात आलेला गाळ टाकून स्थानिक शेतकऱ्यांना शेतात वाहनाने ये- जा करता यावी, यासाठी दहा ते पंधरा किलोमीटर लांबीचा तसेच दहा ते पंधरा फूट रुंदीचा प्रशस्त रस्ता तयार करण्यात आला आहे.
तसेच, या परिसरात विविध देशी जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. स्थानिक शेतकऱ्यांना शेती, फळबागा करण्यासाठी मोफत रोपे, माती देण्यात आली आहे. त्यामुळे शेत शिवारात टाकलेल्या धरणाच्या गाळमातीवर भाजीपाला, गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा आदी पिकांसह आंबा, काजू, नारळ, चिकू आदींच्या फळबागा बहरल्या आहेत.
खानापूरमध्ये खडकवासला धरण तीरावरील पडीक जमिनीवर तयार केलेला शेत रस्ता.
गेल्या पंधरा वर्षांपासून खडकवासला धरणातून गाळ काढण्यात येत आहे. त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता 30 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचा लाभ लाखो पुणेकरांसह जिल्ह्यातील शेतीला होत आहे.कर्नल सुरेश पाटील, अध्यक्ष, ग्रीन थंब संस्था
धरण तीरावरील शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत होते. रस्ता झाल्याने ट्रॅक्टरसह सर्व वाहने थेट शेतात जात आहे. शेतातून बाजारपेठत शेतीमाल नेला जात आहे.प्रियांका प्रमोद जावळकर, उपसरपंच, खानापू