Khadakwasla Dam Latest Update
Pune Rain Update  File Photo
पुणे

Pune Rain Update | सतर्कतेचा इशारा ! खडकवासला धरण परिसरात 100 मिमी. पावसाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा सायकाळी 4 ते 6:00 वा. 35574 क्यूसेक करण्यात आलेलूआहे. तसेच धरण परिसरात 100 मिमी. व घाटमाथ्यावर 300 मिमी. पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. (Pune Rain Update)

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता असण्याची माहिती कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

शहरातील पुढील ठिकाणी त्वरित दक्षता घेण्यात यावी तसेच संबंधित ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत. मध्य भारतात पुढील २ दिवसांत मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच्या ३ दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पुढील २ दिवसांत गुजरातसह कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यानंतरही या भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने बुधवारी सांगितले. (Maharashtra Rain Alert)

पाण्याखाली गेलेली ठिकाणे

  • भिडे पूल

  • गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर.

  • शितळा देवी मंदिर डेक्कन

  • संगम पूल पुलासमोरील वस्ती

  • कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.

  • होळकर पूल परिसर

पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट

पुणे, सातारा जिल्ह्यात उद्या २५ जुलै अतिवृष्टी होईल. तर कोल्हापुरात आज, उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील घाट भागातही तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.

SCROLL FOR NEXT