पुणे

कात्रज डेअरीच्या अध्यक्षा केशरताई पवार यांचा राजीनामा

अमृता चौगुले

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज डेअरीच्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे शुक्रवारी (दि.19) दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या अजेंड्यानुसार दरवर्षी नवीन अध्यक्ष नियुक्त करून अन्य संचालकांना संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

कात्रज दूध संघावर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. संघाच्या निवडणुकीस एक वर्षाचा कालावधी झाला असून, संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान केशरताई पवार यांना मिळाला आहे. दरवर्षी अध्यक्षपदी नवीन चेहर्‍यास संधी देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा असून, त्यानुसारच अध्यक्ष बदल होत असल्याचे सांगण्यात आले.

कात्रज डेअरीच्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी वैयक्तिक कारणांमुळे दिलेला राजीनामा मिळाला असून, तो पुढील कार्यवाहीसाठी संघाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठविला आहे. त्याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत होईल.

                                                                       -महेश कदम,
                                                       विभागीय निबंधक (दुग्ध), पुणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT