Monsoon Early Arrival
पुणे: मान्सूनची प्रगती वेगाने होत असून तो यंदा पाच दिवस आधीच म्हणजे 27 ते 28 मे दरम्यान केरळ मध्ये दाखल होईल असा अंदाज आहे. दरम्यान शनिवारी मान्सूनने प्रगती केली असून तो 13 मे पर्यंत दक्षिण अंदमानासह बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आगमन करणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला.
देशात उष्णतेची लाट आता काही दिवस बाकी असून ती 14 पर्यंत पूर्व भारतातील काही ठिकाणी तीव्र राहील. उद्या 11 रोजी गुजरात राज्यात जोदार वारे वाहत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनची आगेकूच यंदा वेगाने सुरु असून 13 मे रोजी तो दक्षिण अंदमान समुद्रासह आग्नेय बंगालच्या उपसागराच्या काही भागातून पुढे जाईल आणि निकोबार बेटांकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. त्या पुढील 4-5 दिवसांत, दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्राचा भाग तो व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी दिला.
दरवर्षी केरळात मान्सून 1 ते 4 जूनच्या दरम्यान दाखल होतो. काही वर्षाचा मान्सून सातत्याने याच तारखेला केरळ राज्यात येतो मात्र यंदा तो नियोजित वेळेच्या चार ते पाच दिवस आदी म्हणजे 27 ते 28 मे दरम्यान केरळ मध्ये दाखल होईल. त्याचा वेग तसाच राहिला तर तो कोकण किनारपट्टीवर 1 ते 2 जून तर मुंबई, पुणे शहरात 4 ते 5 जून आणि संपूर्ण महाराष्ट्रात 6 ते 8 जून पर्यंत पुढे जाईल असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र काही तज्ञांच्या मते हवेचे दाब अनुकूल असतील तर हा वेग राहिल मात्र हवेचे दाब मध्येच कमी जास्त झाले तर मान्सून मात्र खोळंबतो. त्यामुळे हवेच्या दाबांच्या स्थितीवर त्याचा पुढचा वेग राहिल असेही शास्त्रज्ञांचे मत आहे.