Prostitution Racket Pune Pudhari
पुणे

Katraj Lodge Prostitution: कात्रज बाह्यवळण मार्गावरील लॉजमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

फुरसुंगी पोलिसांचा छापा; एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे : कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर फुरसुंगी पोलिसांनी छापा टाकून तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना देहविक्रय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अजय म्हस्के, अक्षय, सुधाकर, पवन सोनपारखे तसेच बिंदा नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक तेहसीन बेग यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फुरसुंगी परिसरातील कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या क्रिस्टल लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत लाॅजमधून तरुणींना ताब्यात घेतले. लाॅज व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश खांडे तपास करीत आहेत.

शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मसाज पार्लर, लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी बाणेर भागातील लाॅजवर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. याप्रकरणी लाॅज व्यवस्थापकाला अटक करून पोलिसांनी तरुणींना ताब्यात घेतले होते. बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क या भागांत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे प्रकार सुरू आहेत.

कोरेगाव पार्कमध्ये मसाज पार्लरवर छापा

कोरेगाव पार्क भागात एका मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणत तरुणींना ताब्यात घेतले. याप्रकरणी मसाज पार्लरचा व्यवस्थापक फैजल अजिहूर रेहमान अहमद ऊर्फ समीर (वय ३८, रा. कोणार्क व्ह्यू सोसायटी, केशवननगर, मुंढवा) याला अटक केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वणवे यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क भागातील सिल्व्हर सोल स्पामध्ये मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून तरुणींना ताब्यात घेतले. मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT