Kalbhairavnath Yatra Pudhari
पुणे

Kalbhairavnath Yatra: खामुंडीच्या काळभैरवनाथांचे दर्शनाला भाविकांची रांग

यात्रेनिमित्त किसान घमाजी शिंगोटे यांच्या हस्ते श्री काळभैरवनाथ मूर्तीला पहाटे रुद्राभिषेक घालण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: पुणे, ठाणे, नगर या तीन जिल्ह्यांतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या अहिल्यानगर-कल्याण महामार्गालगतच्या श्रीक्षेत्र खामुंडी (ता. जुन्नर) येथील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप गंभीर, उपाध्यक्ष जयराम डुंबरे, कार्याध्यक्ष भास्कर शिंगोटे, सचिव दत्तात्रय खोकराळे, खजिनदार, मारुती कदम यांनी ही माहिती दिली.

यात्रेनिमित्त किसान घमाजी शिंगोटे यांच्या हस्ते श्री काळभैरवनाथ मूर्तीला पहाटे रुद्राभिषेक घालण्यात आला. महाआरती, देवास पोशाख, हारतुरे करण्यात आले. त्यानंतर मांडव डहाळे, शेरण्या, रात्री पालखी मिरवणूक, हभप संगीताताई चोपडे यांचे हरीकीर्तन झाले. बुधवारी (दि.1) अंजली नाशिककर यांचा लोकनाट्य तमाशा, गुरुवारी (दि.2) ऑर्केस्ट्रा झाला.

यात्रेत तळीभंडार, नारळ, बेल, फुले, हार यांची दुकाने सजली होती. पेढे, बर्फी, प्रसाद,शेव-रेवडी, भेळ, उसाचा रस, आईस्क्रीम, खेळणी, पाळणा या दुकानांची मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. ‌’भैरवनाथाचे चांगभले‌’च्या गजराने श्रीक्षेत्र खामुंडी नगरी दुमदुमून गेली.

देवस्थान ट्रस्टच्या वतीने गुरुवारी कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला. त्यात विविध जिल्ह्यांतून आलेल्या मल्लांनी कुस्तीरसिक प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने विजेत्या मल्लांना हजारो रुपयांचे रोख स्वरूपातील इनाम वितरित करण्यात आले.

गावात आलेल्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टने सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या. खामुंडी ग्रामस्थ आणि मुंबईकर, पुणेकर मंडळींनी याकामी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शांताराम बोडके यांनी केले. आभार उपेंद्र डुंबरे यांनी मानले. ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT