Kadus Flood Pudhari
पुणे

Kadus Flood: खेड तालुक्यात पावसाचा तडाखा! 1997 नंतर प्रथमच भैरवनाथ मंदिरात पाणी; कडूसचा संपर्क तुटला

कुमंडला नदी धोक्याच्या पातळीवर; पूलाचा भराव वाहून गेला, शेती व वीज व्यवस्थेचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

कडूस: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः कुंडेश्वर डोंगर परिसरासह कङूस गावच्या पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रांत झालेल्या संततधार पावसाने कुमंडला नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे सन १९९७ नंतर पुन्हा कडूस गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरामध्ये पाणी शिरले.

नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने कुमंडला नदीवर असलेला कडूस-शेंडेवाडी- कारामळी दरम्यान असलेल्या पुलाचा दोन्ही बाजूचा भराव वाहून जाऊन रस्ता तुटला आहे. यामुळे कङूस गावाशी असलेला अनेक गावासह वाड्या-वस्त्याचा संपर्क तुटला आहे.

नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडल्याने कङूस गावच्या स्मशानभूमिला संपूर्ण पाण्याने वेढा घालून असलेली संरक्षण भित वाहून गेली. शेतकरी बांधवांच्या शेतात पाणी साचून अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे बांध फुटून प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच विद्युत खांब पडून विद्युत प्रवाह खंडित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT