वन्य प्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील चिंचोली काशीदाची येथील घटना Pudhari
पुणे

Wild Animal Attack: वन्य प्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील चिंचोली काशीदाची येथील घटना

ही घटना सोमवारी (दि. ८ ) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

पुढारी वृत्तसेवा

Junnar wild animal attack woman death

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील चिंचोली काशीदाची येथील वाजेवाडी वस्तीवरील सीताबाई बबन जाधव जाधव (वय ६०) यांना वन्य प्राण्याने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी (दि. ८ ) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान या महिलेवर बिबट्यानेच हल्ला केला, अशी तक्रार स्थानिक नागरिकांची असून वनविभागाचे उप वनसंरक्षक प्रशांत खाडे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून संबंधित महिलेचा मृतदेह जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. (Latest Pune News)

वन्य प्राण्याने ज्या ठिकाणी हल्ला केला आहे त्या ठिकाणचे सॅम्पल वन विभागाने घेतले असून प्रयोगशाळेमध्ये तपासाअंती हा हल्ला नेमका वन्यप्राण्याने केला काही इतर प्राण्याने हे स्पष्ट होणार आहे. या परिसरामध्ये तातडीने चार पिंजरे लावण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. ड्रोन कॅमेराच्या साह्याने बिबट्याचा शोध देखील सुरू केला आहे.

दरम्यान या परिसरामध्ये गेल्या चार दिवसापासून बिबट्याचा उपद्रव अधिक प्रमाणात वाढला असून दोन दिवसापूर्वी चार-पाच शेळ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. दरम्यान स्थानिक नागरिकांनी या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी केली होती, परंतु वनविभागाने अद्यापही त्या ठिकाणी पिंजरा न लावल्यामुळे स्थानिक नागरिकांची वनविभागाच्या विरोधामध्ये तीव्र नाराजी आहे.

उपवनसंरक्षक प्रशांत खाडे म्हणाले की, या महिलेवर नेमका बिबट्याने हल्ला केला किंवा इतर प्राण्याने हे लगेच सांगणे शक्य नाही; तथापि शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या महिलेच्या डाव्या हाताला खोल जखम असून दोन्ही पायाला जखमा आहेत. या घटनेची माहिती समजतात जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, चिंचोली चे सरपंच खंडू काशीद, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष खैरे यांनी गावचे सरपंच अमोल भुजबळ, उत्तम काशीद, पांडुरंग काशीद यांनी घटनास्थळी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT