गुंजाळवाडी(ता.जुन्नर)येथील अहिल्यानगर कल्याण लगत पलटी झालेली एसटी बस व नागरिकांची गर्दी. 
पुणे

Junnar ST bus accident | गुंजाळवाडीजवळ एस.टी.बसचा भीषण अपघात, दोन वेळा बस उलटली : दोन ठार, १७ जखमी

जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील घटना, रविवारी सांयकाळची घटना

पुढारी वृत्तसेवा

बेल्हे: जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी या ठिकाणी एस टी.बस उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर १७ जण जखमी झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी आगाराची एस.टी.बस (एम.एच.१४ बी.टी ४०२३) शेगाव - कल्याण ही बस रविवारी( दि.१७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कल्याणला जात होती.

गुंजाळवाडी (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत आल्यानंतर समोरून आलेल्या एक अज्ञात वाहनाला वाचविण्याच्या नादात बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात जाऊन बस दोन ते तीन वेळा उलटली या अपघातात दोन जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातातील जखमी याप्रमाणे कोंडीभाऊ कारभारी वाकचौरे (वय ७० ) कमल कोंडीभाऊ वाकचौरे (व ६७ दोघे रा बेल्हे) शंकर शिवाजी शेजाळ (वय ५०) वैशाली शंकर शेजाळ (वय २३ दोघे रा देवडे पंढरपूर) मगन सुखदेव पाटोळे (वय ४८) शोभा मगन पाटोळे (वय ३० दोघे रा बुलढाणा) शारदा बन्सी मेंगळे (वय५९ रा आणे) अश्विनी गणेश बहिरट (वय ४८ रा आणे) अलका नामदेव गायकवाड (वय ५८ रा संगमनेर) अरुण शंकर गुंजाळ (वय ५१ रा बेल्हे) दिपाली बबन डोंगरे (वय 33 रा डोंगरवाडी) उल्हास तांबे (वय ७० रा ओतूर) यमुना यादव पावसे (वय ६० रा हिवरगाव पावसा संगमनेर) दिव्या संजय पवार (वय २१ रा मानवडी सिन्नर) सिद्धेश नितीन काळे (वय १०) आशा नितीन काळे वय ३५) नितीन सिद्धार्थ काळे (वय ३८ सर्व रा पाथर्डी) जखमी झाले आहेत.

दरम्यान या ठिकाणी झालेला अपघाताची तीव्रता पहाता स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना आळेफाटा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघात स्थळी नागरिकांनी मोठे गर्दी केली होती तसेच अहिल्यानगर- कल्याण महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागला तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT