House Theft Pudhari
पुणे

Junnar Bori Budruk Dacoity: बोरी बुद्रुकमध्ये कोयत्याच्या धाकावर दरोडा; १५ तोळे सोने लंपास

जुन्नर तालुक्यातील शेतघरात मध्यरात्री हल्ला; कुटुंबीयांना मारहाण करून दरोडेखोर फरार, परिसरात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील कोरडे मळ्यात शेतात राहत असलेल्या राजेंद्र सिताराम कोरडे यांच्या घरावर कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकून घरातील तिघांना मारहाण करून लोखंडी कपाटील बारा ते पंधरा तोळे सोन्याचे दागिने तसेच लहान मुलाच्या काळातील दागिने लंपास केल्याची घटना रविवारी (दि. 22)मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतची समजलेली माहिती अशी की, राजेंद्र सिताराम कोरडे व त्यांचा मुलगा नितीन राजेंद्र कोरडे हे बोरी बु ll च्या कोरडे मळा येथे आपल्या शेतामध्ये राहत आहेत.घटना घडली त्या दिवशी घरामध्ये राजेंद्र त्यांचा मुलगा नितीन तसेच त्यांची पत्नी हिराबाई सून धनश्री मुलगी दिपाली नातू कृष्णा व नात आरोही व दुसरी नात अन्वी व ओवी एवढे घरामध्ये होते. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास या दरोडेखोरांनी घराच्या दोन्ही दरवाजावर मोठमोठे दगड टाकून घराचा दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला. कुणीही आवाज करायचा नाही असे म्हणत सगळ्यांना दमदाटी केली. कोयत्याचा धाक दाखवून घरातील वीज लावण्यास भाग पाडले तसेच कपाटामध्ये कुठे दागिने आहेत ते दाखवा असे म्हणून धमकवण्यास सुरुवात केली.

तसेच घरातील राजेंद्र कोरडे नितीन कोरडे व मुलगी दिपाली घनवट यांना मारहाण केली. या दरोडेखोरांनी घरातील सगळे साहित्य, कपडे अस्तव्यस्त करून लोखंडी कपाटाचे लॉकर तोडले. सगळ्यांना कोयत्याचा धाक दाखवून घरात कोपऱ्यात बसवले. कपाटात असलेले सोन्याचे सुमारे 15 तोळे वजनाचे दागिने लंपास केले. नातू कृष्णा याच्या कानातील एक सोन्याचा डूल काढून नेला. कृष्णाच्या आईने चोरट्यांना प्रतिकार केल्याने एक डूल चोरट्यांना काढता आला नाही. दरम्यान हे दरोडेखोर अर्धा तास घरामध्ये होते. चार दरोडेखोर आत मध्ये होते व चार जण बाहेर उभे होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे हे सगळे मराठीत बोलत होते अशी ही माहिती मिळत आहे.

दरम्यान दरवाजावर दगडी टाकल्यानंतर या दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून वीज लावण्यास भाग पाडले. व सगळ्यांना सोन्याचे दागिने कुठे आहेत ते दाखवा व अंगावरचे दागिने काढून द्या असे धमकवण्यास सुरुवात केली. साखर झोपेमध्ये असलेल्या सगळी लोकं अचानक घडलेल्या घटनेमुळे घाबरून गेले होते. दरम्यान घरातील सगळे दागिने घेतल्यानंतर या दरोडेखोरांनी सगळ्यांचे मोबाईल काढून घेऊन बाहेरच्या ओट्यावर ठेवले तसेच घराला बाहेरून कडी लावली. आजूबाजूच्या घरांना देखील या दरोडेखोरांनी कड्या लावल्या होत्या. हे दरोडेखोर बोरी परिसरामध्ये आल्यावर एक शेतकरी बोरी - बेल्हे रस्त्याला संजय शिवाजी कोरडे शेतामध्ये पाणी भरायला जात असताना या दरोडेखोरांनी त्याच्याजवळ गाडी थांबून त्याच्या खिशातला मोबाईल काढून घेतला व सिम कार्ड परत दिले. बहुदा आपली माहिती या क्षेत्राने कोणाला देऊ नये म्हणून दरोडेखोरांनी ही काळजी घेतली असावी.

दरम्यान घटनेची माहिती समजताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आजूबाजूला या दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा शोध लागला नाही.सकाळी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, दीपक साबळे, पोलीस हवालदार अक्षय नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली आहे. तसेच असे तज्ञ देखील दाखल झाले आहेत. दरम्यान जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांना याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांना या गुन्ह्याचा तातडीने शोध लावा व रात्रीचे गस्त वाढवा अशा सूचना दिल्या. बोरी परिसरामध्ये या घटनेमुळे भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT