पुणे: यंदा जुलैमध्ये राज्यात सर्वांत कमी पाऊस झाला असून, राज्यातील 358 पैकी तब्बल 225 तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस मराठवाड्यात झाला असून, तेथे 24 टक्के तूट आहे. यंदा कोकणातही जुलैअखेर 5 टक्के तूट आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भाने जेमतेम सरासरी गाठली आहे.
मागच्या वर्षी जुलैअखेर राज्यात चांगली सरासरी होती. सर्वंच भागांत सरासरीपेक्षा 14 टक्के जास्त पाऊस झाला होता. त्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा अन् विदर्भात 14 ते 24 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला होता. मात्र, यंदा जुलैमध्ये राज्यात बहुतांश भागात कमी पाऊस झाला, 358 पैकी 225 तालुक्यांत मोठी तूट असून, फक्त 130 तालुक्यांनी सरासरी पार केली आहे. (Latest Pune News)
महाराष्ट्र : (4 टक्के तूट)
(सरासरी : 577,पडला 555.8 मि.मी.)
कोकण : (5 टक्के तूट)
(सरासरी : 1890, पडला :1801.6 मि.मी.)
मध्य महाराष्ट्र : (3 टक्के अधिक)
(सरासरी : 419.3 मि.मी., पडला : 429.2)
मराठवाडा : (24 टक्के तूट)
(सरासरी : 326.5,पडला : 247.6 मि.मी.)
विदर्भ : (1 टक्का अधिक)
(सरासरी : 526.1,पडला : 532.9 मि.मी.)