पुणे

पुणे : रसदार फळे महागली ; फळांच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने 5 ते 10 टक्क्यांनी वाढ

अमृता चौगुले

पुणे : उन्हाचा कडाका वाढल्याने बाजारात रसदार फळांना मागणी वाढली आहे. त्यातच मुस्लिम धर्मीयांचा रमजान महिना सुरू झाल्याने इफ्तारसाठी बाजारात कलिंगड, खरबूज, अननस, पपईच्या मागणीत चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे या फळांच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली होती.

बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने डाळिंबाच्या भावात 10 टक्क्यांनी घट झाली. तर आवक कमी लिंबाच्या भावात गोनिमागे 200 ते 250 रूपयांनी वाढ झाली होती. इतर सर्वप्रकारच्या फळांचे भाव स्थिर होते. रविवारी (दि. 26) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, संत्री 50 ते 60 टन, मोसंबी 35 ते 40 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबांची सुमारे एक हजार ते बाराशे गोणी, कलिंगड 50 ते 60 टन, खरबूज 20 ते 30 टन, पेरू 20 ते 25 क्रेट्स, चिक्कू एक ते दीड टन, हापूस आंबा 7 ते 8 हजार पेटी, पपई 15 ते 20 टन, पेरू आवक 3 ते 5 टन इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 1000-2000, मोसंबी : (3 डझन) : 220-400, ( 4 डझन) : 100-220, संत्रा : (10किलो) : 300-800, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-180, गणेश : 10-50, आरक्ता 30-60, कलिंगड : 8-14, खरबूज : 22-25, पपई : 12-30, अननस (एक डझन) : 100 ते 600, पेरू (वीस किलो ) : 1000-1200, चिक्कू (दहा किलो ) : 200-500.आंबा -रत्नागिरी हापूस कच्चा 4 ते 7 डझन – 2000 ते 3500 रुपये, 5 ते 9 डझन 2500 ते 4500 रुपये.

SCROLL FOR NEXT