पुणे

पुणे : सराईत कडून 4 लाखांचे दागिने जप्त

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कात्रज परिसरातील बंद घरे लक्ष्य करून घरफोड्या करणार्‍या सराईत लकी ऊर्फ अमीर समीर पठाण (वय 24, रा. संतोषीमाता मंदिरामागे, कात्रज) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून आतापर्यंत पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, 4 लाखांचा चोरी केलेला सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दि. 9 जून रोजी भारती विद्यापीठ परिसरात राहत्या घराचे कुलूप लावून घर बंद असताना चोरट्यांनी 1 लाख 26 हजारांचा ऐवज चोरी करून नेला होता. तसेच, शेजारच्या घरातून 26 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी करून नेला होता.

त्यानुषंगाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पथक शोध घेत होते. याचदरम्यान अंमलदार चेतन गोरे, नीलेश ढमढेरे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, अवधूत जमदाडे यांना लक्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने भरदिवसा बंद घरांची कुलपे तोडून दत्तनगर, धनकवडी, आंबेगाव पठार, कात्रज, सच्चाईमाता आंबेगाव अशा भागांत घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून 70 ग्रॅम वजनाचे 4 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले, तर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. लक्यावर शहरात चोरी आणि घरफोडीचे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, गौरव देव, अंमलदार मंगेश पवार, हर्षल शिंदे यांच्या पथकाने केली.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT