पुणे

जेऊर फाटा रेल्वेगेट 12 तास राहणार बंद

अमृता चौगुले

वाल्हे : जेऊर-निरा मार्गावर असणार्‍या पिंपरे खुर्द हद्दीतील जेऊर फाटा (ता. पुरंदर) येथील रेल्वे गेट सोमवारी (दि. 19) सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. यादरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

निरा-जेऊर, मांडकी, वीर, सारोळा या मार्गावर मिरज-पुणे रेल्वेलाइनवरील जेऊर फाटा येथे रेल्वेचे 28 नंबर किलोमीटर 80/4-5 गेट आहे. हे गेट रेल्वेमार्गाचे काम करण्यासाठी व निरीक्षणासाठी सोमवारी बारा तास बंद राहणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी मांडकी व जेऊर ग्रामपंचायतीला दिली आहे. यादरम्यान जेऊर, मांडकी, लपतळवाडी, वीर, सारोळा येथील नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT