JEE Main 2026 Session 2 Pudhari
पुणे

JEE Main 2026 Session 2 Answer Key: जेईई मेन्स सत्र 2 ची उत्तरसूची जाहीर; 13 एप्रिलपर्यंत आक्षेप नोंदविण्याची संधी

एनटीएकडून उत्तरतालिका प्रसिद्ध; विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करून शुल्कासह आक्षेप नोंदवता येणार, निकाल 20 एप्रिलपर्यंत अपेक्षित

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची जाहीर केली आहे. ‌‘एनटीए‌’च्या अधिकृत वेबसाइट भेट देऊन विद्यार्थ्यांनी उत्तरसूची डाऊनलोड करावी. दि. 13 एप्रिल रात्री 11.50 पर्यंत आक्षेप नोंदवावा. संबंधित परीक्षेचा निकाल 20 एप्रिलपर्यंत लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

एनटीएने देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 2 एप्रिल ते 8 एप्रिल यादरम्यान जेईई मेन्स सत्र 2 परीक्षा घेतली होती. त्याची उत्तरतालिका आता प्रसिद्ध झाली आहे. उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल. उमेदवार 13 एप्रिल रात्री 11:50 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपले आक्षेप नोंदवू शकतात. उमेदवारांना प्रत्येक प्रश्नासाठी 200 रुपये आक्षेप शुल्क देखील भरावे लागेल.

उत्तरसूची अशी करा डाऊनलोड

तात्पुरती उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम वेबसाइटला भेट देऊन होमपेजवरील ‌‘कँडिडेट ॲक्टिव्हिटी‌’ विभागावर क्लिक करा. यानंतर ‌’अपुीशी घशू उहरश्रश्रशपसश षेी गएए (चरळप) - 2026 डशीीळेप-खख‌’ या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुमचा लॉगिन तपशील प्रवीष्ट करा. लॉगिन तपशील प्रवीष्ट केल्यानंतर उत्तरसूची तुमच्या स्क्रीनवर उघडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT