JEE Mains Result 2025
पुणे: जेईई मेन्स 2025 सत्र- 2 ची परीक्षा 2 ते 9 एप्रिलदरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएद्वारे घेण्यात आली. यानंतर 11 एप्रिलला एनटीएने तात्पुरती उत्तरसूची जाहीर केली आणि 13 एप्रिलपर्यंत त्यावर आक्षेप मागवले होते. आता परीक्षेला बसलेले लाखो विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी एनटीएद्वारे जारी केलेले ब्रोशरमध्ये जेईई मेन्सच्या दुसर्या सत्राचा निकाल उद्या गुरुवारी (दि. 17 एप्रिल) जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जेईई मेन्सचा निकाल फक्त एनटीएच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्व उमेदवार त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करून ते तपासू शकतील. निकालांसोबत टॉपर्सची यादी देखील जाहीर केली जाईल. या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांनाच जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र मानले जाईल आणि फक्त तेच या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
...असा पाहता येईल निकाल
जेईई मेन्स निकाल 2025 जाहीर होताच विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर विद्यार्थ्यांना लेटेस्ट न्यूजमधील जेईई मेन्स सत्र- 2 निकाल लिंकवर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि लॉगिनवर क्लिक करावे लागेल. यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल जिथून विद्यार्थ्यांना तो डाऊनलोड करता येणार आहे.