आपणच आपलं वाजवायचं अशी ठाकरे बंधूंची अवस्था: मंत्री जयकुमार गोरे File Photo
पुणे

Jaykumar Gore: आपणच आपलं वाजवायचं अशी ठाकरे बंधूंची अवस्था: मंत्री जयकुमार गोरे

भाजपने व युती सरकारने नेहमीच मुंबईचा सन्मान केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Jaykumar Gore on Thackeray Brothers

बारामती: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता जवळ आली आहे. त्यामुळे आपणच आपलं वाजवायचं अशी परिस्थिती ठाकरे बंधूंची आहे, या शब्दांत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. भाजप मुंबई महाराष्ट्रापासून तोडत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्यामध्ये केला होता.

याबाबत गोरे यांना विचारले असता ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठी माणूस आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विषय काढला जातो. भाजपने व युती सरकारने नेहमीच मुंबईचा सन्मान केला आहे. (Latest Pune News)

गोरे पुढे म्हणाले, महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे आणि याचं स्वागत केलं पाहिजे. माहिती न घेता आपलं उठसूट काहीतरी बोलायचं आणि आपल्या बुद्धीचं दिवाळं काढून घ्यायचं... ही परिस्थिती आपण सर्व जण पाहात आहोत, असं म्हणत गोरे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT