Janhavi Killekar angry at Suraj Chavan wedding File photo
पुणे

करवलीच्या नाकावर राग! सूरज चव्हाणच्या लग्नात जान्हवी किल्लेकर चिडली; नेमकं काय घडलं?

Janhavi Killekar angry at Suraj Chavan wedding : बिग बॉस मराठी फेम सुरज चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. विवाह सोहळ्यात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा राग अनावर झाला आणि ती काहीशी भडकलेली दिसली.

पुढारी वृत्तसेवा

Janhavi Killekar angry at Suraj Chavan wedding

सासवड: बिग बॉस मराठी फेम सुरज चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. सुरजचा विवाह काल, सासवड येथील माऊली गार्डनमध्ये मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याला मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. 'बिग बॉस'मधील त्याची सहकलाकार आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिनेही या सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र, लग्नाच्या या आनंदमय वातावरणात एक वेगळीच घटना घडल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे जान्हवीचा पारा चढला.

गर्दीमुळे जान्हवी किल्लेकर चिडली!

सुरज चव्हाणच्या या विवाह सोहळ्याला त्याच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे जान्हवी किल्लेकरचा राग अनावर झाला आणि ती काहीशी भडकलेली दिसली. प्रचंड गर्दी आणि गोंधळामुळे वैतागलेल्या जान्हवीने उपस्थित लोकांना हात जोडून विनंती केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT