पुणे

आयटीआय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून..!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत येणार्‍या राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) विविध ट्रेडसाठी सोमवारी 3 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी संचालनालयाकडून आयटीआय मधील या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर केले जाणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यात एकूण 418 शासकीय आणि 574 खासगी संस्थांच्या माध्यमातून आयटीआय चालविले जातात. यामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये 1 लाख 48 हजार 568 जागा उपलब्ध आहेत.

शासकीय आयटीआयमध्ये 80 हून अधिक ट्रेडसाठी 92 हजार 264 जागा, तर खासगी आयटीआयमध्ये 56 हजार 204 इतक्या प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत. नाशिक विभागातील आयटीआयमध्ये सर्वाधिक 30 हजार 816 जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल पुणे विभागामध्ये शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये 29 हजार प्रवेशाच्या 248 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर नागपूर विभागात 27 हजार 408 आणि मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागांमध्ये प्रत्येकी 20 हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT