पुणे

पुणे : ‘एमआयटी एडीटी’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाला केंब्रिज विद्यापीठाच्या प्रतिष्ठित 'द एक्सलन्स इन एम्प्लॉयबिलिटी सपोर्ट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या केंब्रिज सेंटर लीडर्स परिषदेमध्ये जगभरातील केंब्रिज नेत्यांच्या उपस्थितीत एमआयटी एडीटीला ही मान्यता देण्यात आली. हा पुरस्कार एमआयटी एडीटीच्या स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे केंब्रिज अधिकृत परीक्षा केंद्र (आयए 679) माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगारक्षमतेत यशस्वी करिअर मार्गदर्शन करण्यासाठी देण्यात आला आहे.

केंब्रिज इंग्लिशचे दक्षिण आशिया संचालक टी. के. अरुणाचलम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला. केंब्रिजचे प्रेस व मूल्यांकन संचालक अरुण राजमणी, पॉल कोल्बर्ट या अधिकार्‍यांनी संस्थेचे कौतुक केले. एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या केंब्रिज अधिकृत परीक्षा केंद्राने शैक्षणिक उत्कृष्टता आणि सर्वांगीण विद्यार्थी विकासासाठी वचनबद्धता कायम ठेवताना भरीव योगदान दिले आहे.

प्रतिष्ठित एक्सलन्स इन एम्प्लॉयबिलिटी सपोर्ट पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे.या उपलब्धीसाठी डॉ. अतुल पाटील व एमआयटी स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट व विद्यापीठातील अधिकृत केंब्रिज परीक्षा केंद्राच्या सर्व टीमचे अभिनंदन.
प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू तथा कार्याध्यक्ष, एमआयटी, एडीटी विद्यापीठ

हेही वाचा

SCROLL FOR NEXT