पुणे

पुणे जिल्ह्यात मतदार याद्या बारकाईने अद्ययावत करण्याचे निर्देश

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू असून, सर्व अधिकार्‍यांनी मतदार याद्या बारकाईने अद्ययावत कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय, नोंदणी अधिकारी, अतिरिक्त तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले, त्या वेळी डॉ. देशमुख बोलत होते. प्रशिक्षणाला उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या.

डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात 1 जानेवारी 2024 पर्यंत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी 11 शहरी व 10 ग्रामीण मतदारसंघ आहेत. याद्या अद्ययावत करताना अधिकार्‍यांनी विशेष दक्षता घ्यावी. 80 वर्षांवरील मतदारांचे सर्वेक्षण करावे, पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. सध्या आधुनिक सॉफ्टवेअर येत आहे. मतदार नोंदणीसाठी शाळा, महाविद्यालये, स्थानिक संस्था या ठिकाणी व्यवस्था करावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या कामाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT