पुणे

कांद्याची आवक घटली ; पालेभाज्या, टोमॅटो, वाटाण्याच्या भावात घसरण

अमृता चौगुले

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालकाची भरपूर आवक होऊन भाव गडगडले. फळभाज्यांच्या
बाजारात टोमॅटो व वाटाण्याच्या भावात घसरण झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गायी, बैल, म्हशी व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घट होऊनही भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल 2 कोटी 90 लाख रुपये झाली.

येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 500 क्विंटलने घटल्याने भावात 250 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 2,300 रुपयांवरून 2,550 रुपयांवर पोहचला. बटाट्याची एकूण आवक 1,500 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. बटाट्याला 2,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून लसणाचा कमाल भाव 14 हजार रुपयांवरच स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 375 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 65 क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला 2 हजार 500 रुपयांपासून ते 4 हजार 500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा – एकूण आवक – 1,500 क्विंटल. भाव क्रमांक 1 : 2,550 रुपये, भाव क्रमांक 2 : 1,800 रुपये, भाव क्रमांक 3 : 1,500 रुपये. 2,000 रुपये, भाव क्रमांक 2 : 1,600 रुपये, भाव क्रमांक 3 : 1,300 रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे : टोमॅटो – 330 क्विंटल (2,500 ते 3,500 रुपये), कोबी – 208 क्विंटल ( 600 ते 1,000), फ्लॉवर – 225 क्विंटल (500 ते 1,500), वांगी – 96 क्विंटल (1,500 ते 2,500), भेंडी – 60 क्विंटल (1,000 ते 2,000), दोडका – 72 क्विंटल (2,000 ते 3,000), कारली – 82 क्विंटल (1,500 ते 2,500), दुधीभोपळा – 64 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी – 78 क्विंटल (500 ते 1,200), फरशी – 60 क्विंटल (1,000 ते 2,000), वालवड – 72 क्विंटल (2,000 ते 4,000), गवार – 60 क्विंटल (4,000 ते 6,000), ढोबळी मिरची – 375 क्विंटल (2,500 ते 4,500), चवळी – 28 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा – 100 क्विंटल (5,000 ते 6,000), शेवगा – 35 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर – 115 क्विंटल (1,500 ते 2,500).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी – एकूण 9 हजार 600 जुड्या (1,000 ते 1,500 रुपये), कोथिंबीर – एकूण 38 हजार 500 जुड्या (100 ते 400 रुपये), शेपू – एकूण 4 हजार, 700 जुड्या (400 ते 600 रुपये), पालक – एकूण 3 हजार 650 जुड्या (500 ते 900 रुपये).

जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 32 जर्शी गायींपैकी 18 गायींची विक्री झाली (20, 000 ते 50,000 रुपये), 90 बैलांपैकी 78 बैलांची विक्री झाली (15,000 ते 30,000 रुपये), 110 म्हशींपैकी 95 म्हशींची विक्री झाली (30,000 ते 80,000 रुपये), 3,950 शेळ्या-मेंढ्यांपैकी 3,510 शेळ्यांची विक्री झाली (20,000 ते 25,000 रुपये). चाकण येथील जनावरांच्या बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून जनावरांचे भाव स्थिर राहिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT