Monsoon Good News  Canva Image
पुणे

Monsoon Good News | मान्सून पोहचला भारताच्या सीमेजवळ!

दोन ते तीन दिवसांत केरळात होणार दाखल, यंदा अल निनो सक्रिय तरीही हिंदी महासागरात अनुकूल स्थिती

पुढारी वृत्तसेवा

पुणेः मान्सूनने शनिवारी अरबी समुद्रात जोरदार प्रगती केली. श्रीलंका देश ओलांडून तो भारतीय किनारपट्टीजवळ आला आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत तो केरळ, तामिळनाडूसह दक्षिण किनारपट्टीवर दाखल होईल, असा अंदाज आहे.

यंदा अल निनो सक्रिय असला, तरीही हिंदी महासागरात अनुकूल स्थिती आहे. तेथील पाण्याचे तापमान वाढल्याने मान्सून वेगाने प्रगती करीत आहे. १६ मे रोजी अंदमानात आलेल्या मान्सूनने आठवडाभरात अंदमान निकोबारसह बंगालचा उपसागर, अरबी समुद्राचा बहुतांश भाग काबीज केला. तो श्रीलंकेच्या मध्यभागातून शनिवारी बराच पुढे सरकला. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत भारतीय किनारपट्टीवर दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT