Tuberculosis Pudhari
पुणे

Drug Resistant TB Six Month Treatment: औषध-प्रतिरोधक क्षयरोगावर सहा महिन्यांत प्रभावी उपचार; आयसीएमआरचा अभ्यास

दीर्घकालीन उपचारांपेक्षा कमी खर्चात अधिक परिणामकारक ऑल-ओरल पद्धत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगावर कमी कालावधीत, कमी खर्चात आणि अधिक प्रभावी उपचार शक्य असल्याचे नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सहा महिन्यांचे पूर्णतः तोंडी उपचार सध्या वापरात असलेल्या दीर्घकालीन उपचारांपेक्षा अधिक परिणामकारक ठरत असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय वैद्यक संशोधन संस्थेतर्फे हा अभ्यास करण्यात आला असून, तो ‌‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च‌’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासात बेडाक्विलिनवर आधारित दोन उपचार पद्धतींची तुलना सध्या राष्ट्रीय पातळीवर वापरल्या जाणाऱ्या 9 ते 20 महिन्यांच्या उपचारांशी करण्यात आली आहे.

अभ्यासानुसार, बीपीएएल ही उपचार पद्धत रुग्णांसाठी अधिक परिणामकारक असून आरोग्य व्यवस्थेचा खर्चही कमी करते. म्हणजेच रुग्णांचे आरोग्य अधिक चांगले सुधारते आणि त्यासाठी कमी खर्च येतो. औषध-प्रतिरोधक क्षयरोगाच्या उपचारांना सध्या जास्त कालावधी लागतो. त्याचे दुष्परिणामही अधिक असतात आणि खर्चही मोठा असतो. मात्र, सहा महिन्यांचे हे नवीन ऑल-ओरल उपचार रुग्णांना नियमित उपचार घेणे सोपे ठरते. रुग्णांना होणारा त्रास कमी होतो आणि रुग्ण लवकरात लवकर दैनंदिन आयुष्य जगू शकतात. उपचारांचा कालावधी कमी झाल्यामुळे रुग्णांवरील ताण कमी होतो. आरोग्य यंत्रणेवरील खर्च आणि मनुष्यबळाचा भारही घटतो. त्यामुळे देशातील क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना गती मिळू शकते, असे अभ्यासात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT