पुणे: ओसामाबीन लादेनसाठी बांधलेल्या व्हीआयपी गेस्टहाऊसहीत एकुण सहा महत्वाच्या दहशतवादयांच्या इमारती या युध्दात भारतीय सैनिकांनी पाडून टाकल्या. गत चार दिवस सुरु असलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे भारताने पाकिस्तानच्या नांग्याच ठेचून काढल्या.
भारताने अचूक मारा करीत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डेच उध्वस्त करीत सगळ्या जगासमोर त्यांचे पितळ उघडे केले. गुजरातच्या भूज शहरातील निवृत्त कर्नंल तथा सॅटेलाईट इमेजरी तज्ज्ञ विनायक भट यांनी युध्द समाप्तीनंतर खास पुढारीकडे या भावना व्यक्त केल्या. (Latest Pune News)
कर्नंल विनायक भट हे गुजरात मध्ये राहतात. ते सॅटेलाईट इमेजरी तज्ज्ञ म्हणून देशभर प्रसिध्द आहेत.शुक्रवारी त्यांचे ऑनलाईन व्याख्यान पुणे इंटरनॅशनल सेंटर मध्ये प्रसारीत करण्यात आले होते.त्यांनी यात ज्या बाबी सांगितल्या त्या तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत.
त्यांनी युध्द संपताच भारताने पाकिस्तानच्या नेमक्या कोणत्या मर्मस्थळावर घाला घालून ती उध्वस्त केली. याची माहिती दिलीज्या ठिकाणी भारताने हल्ले केले त्याच्या साटेलाईट इमेजेस दाखवत हा ऑपरेशन सिंदूरची यशस्वी कहाणीच सांगितली.