इंदापूर : इंदापूर पोलिस ठाणे अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील रेडणी, निरा नरसिंहपूर, गिरवी, गणेशवाडी इत्यादी ठिकाणी देशी-विदेशी व गावठी हातभट्टी दारू विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये सात व्यक्तींवर कारवाई करून एकूण 15 हजार 860 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सुभाष वामन चव्हाण, नागेश संजय चव्हाण, अजय संभाजी चव्हाण, जयवंत नामदेव हाके (सर्व रा. रेडणी, ता. इंदापूर), सयाजी महादेव घोगरे (रा. गणेशवाडी, ता. इंदापूर), तानाजी जनार्दन भंडलकर (रा. गिरवी, ता. इंदापूर), गणेश सहदेव शिंदे (रा. निरा नरसिंहपूर, ता. इंदापूर) यांच्यावर बावडा दूरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.