Indapur Independence Day Protest Pudhari
पुणे

Indapur Independence Day Protest: इंदापुरात स्वातंत्र्यदिनी आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आंदोलन; तहसीलदारांना आंबेडकरांची प्रतिमा भेट

संविधानाचा सन्मान आणि महामानवांच्या विचारांचा आदर करण्याची मागणी; भिगवण येथील महाराजस्व शिबिरातील घटनेच्या निषेधार्थ गांधीगिरी

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर: देशाचा स्वातंत्र्यदिन इंदापुरात उत्साहात साजरा झाला. प्रशासकीय भवनात तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस, महसूल आणि इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शनिवारी ध्वजारोहणादरम्यान आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी हातात संविधानाची प्रत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेत प्रशासकीय भवनाच्या आवारात घोषणाबाजी केली. गांधीगिरी मार्गाने केलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी संविधानाचा सन्मान व्हावा आणि महामानवाच्या विचारांचा आदर केला जावा, अशी मागणी केली.

आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांची भेट घेऊन त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी तहसीलदारांनी आंदोलकांचे म्हणणे समजून घेत सकारात्मक चर्चा केली.

१ ऑगस्ट रोजी इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे झालेल्या महाराजस्व शिबिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी हा निषेध नोंदवण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.

प्रशासनाने देखील याची दखल घेऊन पुढील कार्यक्रमांमध्ये सर्वच महामानवांचा सन्मान राखला जाईल असे आश्वासन दिले. शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनाची इंदापुरात चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT