पुणे

पिंपरी : ड्रॅगन फ्रुट, किवीला वाढली मागणी ; डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गुनिया या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या शरीरातील पांढर्‍या पेशींची संख्या झपाट्याने कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञ ड्रॅगन फ्रूट अथवा किवी फळे खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे सध्या बाजारात ड्रॅगन फ्रूट व किवी या फळांना अधिक मागणी असल्याचे फळविके्रत्यांनी सांगितले.

 वैद्यकीय विभागाच्या माहितीनुसार, शहरात दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढते. यामध्ये रुग्णाची प्रतिकारक्षमता कमी होऊन पेशींची संख्याही कमी होत जाते. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट व किवी फळांमुळे पेशी वाढण्यास मदत होते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
शहरातील प्रत्येक रूग्णालयात डेंग्यू, चिकन गुनीया व मलेरीया या आजारांनी ग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये रूग्णांची कमी झालेली प्रतिकार क्षमता व पेशींच्या घटलेल्या संख्येत वाढ होण्यासाठी आम्ही औषध उपचारांसह ड्रॅगन फ—ु ट व किवीसांरखी फळे खाण्याचा सल्ला देत असतो. तसेच या फळांच्या सेवनामुळे पचनक्रिया ही उत्तम राहते.
                                                          – डॉ. स्वप्निल गोसावी, चिंचवड.

बाजारात ड्रॅगन फ्रूट व किवी या फळांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे; मात्र मागणीच्या प्रमाणात उत्पादन कमी आहे. परिणामी बर्‍याचदा या फळांचा तुटवडा बाजारात दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ड्रॅगन फ्रूट व किवी या फळांचा एखादाच बॉक्सची विक्री होत होती. आता सध्या दिवसाला तीन ते चार बॉक्सची विक्री होत आहे.
                                                  – मनोज मुलाणी, विक्रेता, पिंपरी.

फळ दिवसाला विक्री (किलो) आयात देश
ड्रॅगन फ्रूट 15-20 व्हिएतनाम
किवी 25-30 चिली, न्यूझीलंड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT