पुणे

पिंपरी बाजारात भाज्यांच्या दरात वाढ; घ्या जाणून आजचे दर

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या दोन दिवसांपासून मोसमी पावसाने हजेरी लावली आहे; परंतु पाऊस सुरू होण्यास विलंब झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. बाजारात आवक घटल्याने दरात वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे. पावसाअभावी मेथी, कोथिंबीर पालक, आले, लसूण, बिन्स, चवळी, फ्लावर, कडीपत्ता, कारली आदीं भाज्यांचे उत्पादन घटून आवकही घटली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली असून, टोमॅटोचे दरही वाढले आहेत.

शहरातील मोशी उपबाजार, आकुर्डी, पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत मेथीची पेंडी 30 रुपये, कोथिंबीर 40, पालक 30, आले 170 किलो, लसूण 120 ते 150, बिन्स 140, चवळी 70, फ्लावर 60 ते 70, कारली 70 किलोने विक्री होत आहे. गेले चार ते पाच महिने 15 रूपये प्रतिकिलो दर असलेल्या टोमॅटोची विक्री 50 ते 60 प्रतिकिलोने होत आहे.

मोशी उपबाजारात टोमॅटो 280क्विंटल, कांदा 280 क्विंटल, बटाटा 542 क्विंटल, मटार 10 क्विंटल, भेंडी 95 क्विंटल, आले 30 क्विंटल, कारली 31 क्विंटल, शेवगा 25 क्विंटलची आवक झाली आहे. घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर : टोमॅटो 30 ते 35, मिरची 40, कांदा 7 ते 9, बटाटा 10, लसूण 60 ते 70, आले 70 ते 80, भेंडी 20 ते 25, मटार 50 ते 55 रूपये दराने विक्री होत आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्यांची 34,100 गड्डी आवक झाली आहे. फळे 318 क्विंटल आणि फळभाज्यांची आवक 2496 क्विंटल एवढी झाली आहे.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या ः दर (प्रतिरजुडी)
मेथी 30
कोथिंबीर 40 ते 45
कांदापात 25
शेपू 25
पुदिना 15
मुळा 15
चुका 15
पालक 30

फळभाज्यांचे ः किलोचे भाव
कांदा 15 ते 20
बटाटा 20
आले 170
भेंडी 60
टामॅटो 50 ते 60
सुरती गवार 40 ते 50
गावरान गवार 60
दोडका 60
दुधी भोपळा 70
लाल भोपळा 60 ते 70
कारली 70
वांगी 70
भरीताची वांगी 70
तोंडली 50
पडवळ 60
फ्लॉवर 60 ते 70
कोबी 30 ते 40
लसूण 120 ते 150
काकडी 50
शिमला मिरची 70
शेवगा 90

SCROLL FOR NEXT