पुणे

पिंपरी : वल्लभनगर आगारात प्रवाशांची गैरसोय

अमृता चौगुले

राहुल हातोले : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत राज्याच्या विविध ठिकाणांहून माणसे ये-जा करीत असतात. शहरातील प्रवाशांच्या सेवेसाठी पिंपरी येथे वल्लभनगर एसटी आगार आहे; मात्र या आगारात येणार्‍या प्रवाशांना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे.
या आगारातील पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. तसेच परिसरात जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालक, प्रवाशांसह आगारातील अपंग कर्मचार्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.

आगारात खड्डे 

बस स्थानकांचे आगार की खड्यांचे आगार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. आगारातील प्रवाशांसह अपंग कर्मचार्‍यांनाही त्याचा त्रास होत आहे. तरीही या दुरवस्थेकुडे महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेले पोलिस मदत केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. तसेच येथील बरेच गाळेही बंद आहेत. भाडेवाढ केल्याने हे गाळे बंद असल्याची माहिती आहे. मात्र त्यामुळे एसटीचे उत्पन्न तोट्यात आले आहे. स्मार्ट सिटीतील एसटी आगारात कपडे वाळत घातल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आगाराला धोबी घाटाचे रूप आल्याचे दिसून येत आहे. याबाबत मात्र आगार प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

आगारात छताला गळती
आगारातील छताची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील छत सतत गळत होते. परिणामी, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. अद्यापही या छताची डागडुजी करण्यात आलेली नाही.

SCROLL FOR NEXT