पुणे

बिबवेवाडी : अप्पर डेपो परिसरामध्ये रस्ता खोदल्याने गैरसोय

अमृता चौगुले

बिबवेवाडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी परिसरातील अप्पर डेपोशेजारी विद्युत वाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होते असल्याने वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

परिसरात सकाळच्या वेळी बांधकाम मजूर रोजगाराची प्रतीक्षा करीत उभे असतात. मात्र, हा रस्ता खोदण्यात आल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. अ‍ॅड. रवींद्र गायकवाड म्हणाले, की अप्पर डेपो येथील एका बांधकामाच्या शेजारी रस्ता खोदून पंधरा दिवस झाले. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे यांनी हे काम महापालिकेच्या मुख्य खात्याचे असल्याचे सांगितले.

अप्पर डेपो येथील कामगार पुतळ्याशेजारी वीज वाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. तो लवकरात लवकर बुजवून त्यांची दुरुस्ती केली जाईल.

– आदिल तडवी,
पथ विभाग, महापालिका

SCROLL FOR NEXT