पुणे

भविष्यात एनडीएमध्ये महिला, पुरुष पदवी संपादन करतील : डॉ. शांतीश्री धुलिपुडी पंडित

अमृता चौगुले

पुणे : एनडीए ही जगातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था आहे. म्हणूनच, भविष्यात येथे महिला आणि पुरुष अधिकारी एकत्रित
पदवी संपादन करतील, ही देशवासीयांसाठी गौरवास्पद बाब ठरेल, असे मत दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलिपुडी पंडित यांनी व्यक्त केले. खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी येथे मंगळवारी (दि. 29) आयोजित 143 व्या तुकडीच्या पदवीदान समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.

एनडीएचे कमांडंट व्हाइस अ‍ॅडमिरल अजय कोच्छर, डेप्युटी कमांडंट मेजर जनरल संजीव डोग्रा, प्रिन्सिपल ओमप्रकाश शुक्ला यांच्यासह वेगवेगळ्या फॅकल्टीचे प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. शांतीश्री यांच्या हस्ते या प्रसंगी बीएस्सीमध्ये प्रथम अर्पित कुमार, बीएस्सी कॉम्प्युटरमध्ये आकाश कासवान, बीएमध्ये निशांत शर्मा आणि बी. टेकमध्ये प्रथम आलेल्या अमर उपाध्याय या कॅडेटना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. डॉ. पंडित म्हणाल्या, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपला देश साजरा करीत आहे. देशाची वाटचाल आत्मनिर्भरतेच्या दिशेने व्हावी, याकरिता डीआरडीओ सारख्या संस्था देखील भारतीय बनावटीची उत्पादने आणि तंत्रज्ञानाला  प्राधान्य देत आहेत.

SCROLL FOR NEXT