पुणे

शिक्रापुरात राखी बगळ्याला, वाजेवाडीत मांजराला जीवदान

अमृता चौगुले

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्रापूर (ता. शिरूर) येथे राखी बगळ्याला, तर वाजेवाडी येथे कस्तुरी मांजराला प्राणिमित्रांनी जीवदान दिले. राखी बगळ्याला निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करण्यात आले, तर अस्वस्थ अवस्थेत असलेल्या दुर्मीळ कस्तुरी मांजराला वन विभागाच्या वतीने जुन्नर येथे दाखल करण्यात आले. शिक्रापूर येथील तळेगाव रोड परिसरात मंगळवारी (दि. 30) सायंकाळच्या सुमारास महावितरणचे ज्ञानेश्वर पांडे हे काम करीत असताना एक मोठा पक्षी जाळीत अडकल्याचे त्यांना दिसले. याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे शेरखान शेख यांना दिली. त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत येथे जाळीत अडकलेल्या दुर्मीळ राखी बगळ्याला जाळीतून मुक्त केले.

बुधवारी (दि. 31) सकाळी वाजेवाडी येथे एक प्राणी अस्वस्थ अवस्थेत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कचरू वाजे यांना दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच शेरखान शेख व अमोल कुसाळकर हे त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता ते दुर्मीळ कस्तुरी मांजर असल्याचे समजले. या मांजराला ताब्यात घेतले. त्यानंतर शिरूर वनपरिमंडलाधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील व बबन दहातोंडे यांना माहिती देण्यात आली.

SCROLL FOR NEXT