पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. सध्या फेब्रुवारी महिन्यातच पिंपरी चिंचवड शहरात तापमानाचा पारा 35 ते 38 अंशावर आहे. त्यामुळे रांगेत उभे राहून मतदान करताना मतदारांना उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. कमाल तापमानात वाढ होत आहे. आठवडाभर तरी शहरात ही स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
रविवारी मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मतदान प्रक्रिया पार पडत असताना वाढत्या उन्हासाठी नागरिकांनी आत्तापासूनच खबरदारीचे उपाय करावेत, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
उन्हापासून संरक्षण करण्याचे उपाय घरातून निघताना भरपूर पाणी प्या, सोबत पाण्याची बाटली ठेवा. गॉगल, टोपी, रुमाल किंवा छत्री यांचा वापर करा.