पुणे

हिरवी मिरची, टोमॅटो, कोबीची आवक वाढली

अमृता चौगुले

चाकण(पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरव्या मिरचीसह टोमॅटो व कोबीची आवक वाढली. कांद्याची आवक व भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले. फळभाज्या व पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भावात घसरण झाली. बटाट्याची आवक घटून भाव स्थिर राहिले. सातार्‍याहून आले, मुरबाडहून भेंडी व गुजरातहून तोतापुरी आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय व म्हैस यांच्या संख्येत वाढ झाली, तर बैल व शेळ्या- मेंढ्यांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल 3 कोटी 70 लाख रुपये झाली.बाजारात कांद्याची एकूण आवक 6,000 क्विंटल झाली.

गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक स्थिर राहून भावही 900 रुपयांवर स्थिरावले. बटाट्याची एकूण आवक 1,000 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 250 क्विंटलने घटून कमाल भाव 1,800 रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून कमाल भाव 7 हजार रुपयांवरून 6 हजार रुपयांवर स्थिरावला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक 425 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 200 क्विंटलने घटून भाव स्थिर राहिले. हिरव्या मिरचीचा 2 हजार रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे – कांदा – एकूण आवक – 6,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 900 रुपये, भाव क्रमांक 2. 700 रुपये, भाव क्रमांक 3. 500 रुपये.बटाटा – एकूण आवक – 1,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,800 रुपये, भाव क्रमांक 2. 1,500 रुपये, भाव क्रमांक 3. 1,100 रुपये.

फळभाज्या – फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे – टोमॅटो – 330 क्विंटल (500 ते 800 रुपये), कोबी – 190 क्विंटल ( 500 ते 800), फ्लॉवर – 197 क्विंटल (600 ते 900), वांगी – 83 क्विंटल (1,000 ते 2,000), भेंडी – 135 क्विंटल (2,000 ते 4,000), दोडका – 63 क्विंटल (3,000 ते 4,000), कारली – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा – 62 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी – 74 क्विंटल (2,000 ते 3,000), फरशी – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), वालवड – 63 क्विंटल (1,500 ते 2,500), गवार – 14 क्विंटल (7,000 ते 9,000), ढोबळी मिरची – 136 क्विंटल (2,000 ते 3,000), चवळी – 24 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा – 40 क्विंटल (6,000 ते 8,000), शेवगा – 30 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर – 105 क्विंटल (1,500 ते 2,000).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :
मेथी – एकूण 26 हजार 530 जुड्या (1,000 ते 1,500 रुपये), कोथिंबीर – एकूण 28 हजार 950 जुड्या (1,000 ते 1,500 रुपये), शेपू – एकूण 3 हजार 400 जुड्या (800 ते 1,000 रुपये), पालक – एकूण 4 हजार जुड्या (400 ते 600 रुपये).
जनावरे – जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 49 जर्शी गायींंपैकी 28 गायींची विक्री झाली (10,000 ते 60,000 रुपये), 105 बैलांपैकी 70 बैलांची विक्री झाली (10,000 ते 45,000 रुपये), चाकणला विक्रीसाठी आलेल्या 130 म्हशींपैकी 85 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 30 हजार ते 80 हजार रुपये भाव मिळाला. शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घट झाली असून, विक्रीसाठी आलेल्या 10,300 शेळ्यांपैकी 9,930 शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT