Pune Drug Case
पुणे शहर अमली पदार्थांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय File Photo
पुणे

पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांचे महत्त्वपूर्ण पाऊल

पुढारी वृत्तसेवा

पुणे : शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या ड्रग कारवाया व त्या निमित्ताने ड्रगतस्करांनी शाळा, महाविद्यालय, उच्चभू सोसायट्यांमध्ये अमली पदार्थांची तस्करी थांबविण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून कॉलेजमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

संशयित विद्यार्थ्यांच्या बॅगही तपासणार

प्रशिक्षीत शिक्षकांकडून संशयित विद्यार्थ्यांच्या बॅगही तपासल्या जाणार आहेत. हे शिक्षक थेट पोलिसांच्या संपर्कात राहणार आहेत. अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी शहरातील मोठ मोठे कॉलेज, त्यांचे होस्टेल यामध्ये पोलिसांकडून जनजागृती, प्रशिक्षण, देखरेख ठेवली जाणार आहे. या सर्व प्रशिक्षण प्रक्रीयेत मुक्तांगण, विविध सामाजिक संस्था यांची देखील या जनजागृतीसाठी मदत घेतली जाणार आहे.

आयटी पार्क, बीपीओच्या ठिकाणी पुणे पोलिस जनजागृती करणार

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्यानंतर त्यांना काय खबरदारी घ्यायची याबाबतही माहिती दिली जाणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना ड्रग सेवनाच्या परिणांबाबत जागरूक करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे पोलिसांकडून आयटी पार्क, बीपीओ, उच्च शिक्षीत काम करत असलेली ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे.

SCROLL FOR NEXT