स्कूल बस Pudhari
पुणे

Pune News : स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशनची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला अधिक सुरक्षित आणि सुलभ कसे बनवता येईल, यावर दोन्ही संघटना एकत्रितपणे विचारविनिमय करणार आहेत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीसाठी स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशन यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण बैठक परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त यांच्या निर्देशानुसार आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या पत्रानुसार ही बैठक दिनांक ०८ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होणार आहे.

या बैठकीमध्ये स्कूल बस आणि पालक असोसिएशनच्या सदस्यांच्या विविध समस्या व सूचनांवर चर्चा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला अधिक सुरक्षित आणि सुलभ कसे बनवता येईल, यावर दोन्ही संघटना एकत्रितपणे विचारविनिमय करणार आहेत.या बैठकीसाठी स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशनच्या सर्व महत्त्वपूर्ण सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

या बैठकीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत स्कूलबस असोशिएशन व पालक असोशिएशन यांच्या प्रतिनिधींना कळविण्याबाबत या कार्यालयास कळविण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने स्कूलबस असोशिएशन व पालक असोशिएशन यांच्या वतीने सदर बैठकीस उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक या कार्यालयास कळविल्यास त्याची माहिती मा. परिवहन आयुक्त कार्यालयास त्वरित सादर करणे शक्य होईल.
- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
प्रत्येक जिल्ह्यात अनेक स्कूलबस आणि पालक संघटना आहेत प्रत्येक जिल्ह्यातून एकाची निवड शासन कशाप्रकारे करणार आहे सर्वांना बैठकीचे निमंत्रण परिवहन आयुक्त कार्यालयाने द्यायला हवे आहे, एकाच्या मतावर सर्वांचे मत ठरवणे चुकीचे आहे..
बापू भावे, अध्यक्ष स्कूलबस व स्कूल व्हॅन संघटना, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT