पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : देऊळवाडा व संत तुकोबारायांचे घर या दोन्हींच्यामध्ये इनामदार वाडा आहे. आषाढी वारीसाठी तुकोबारायांची पालखी मार्गस्थ झाल्यानंतर पहिला मुक्काम या वाड्यात असतो. म्हणून या वाड्याला महत्त्व आहे. संस्थान हे पूर्वी इनामदारांच्या ताब्यात होते. हे मोरे वशंजातीलच मात्र त्यांना तुकाराम महाराज यांच्याकडून इनामदार ही पदवी बहाल केल्यामुळे इनामदार हे नाव पडले.
त्यांना किन्हई, येलवडी व सांगुर्डी ही गावे इनाम म्हणून दिली होती. परंपरेनुसार आजतागायत नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरु केला तेव्हापासून पालखीने प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला मुक्काम हा इनामदार वाड्यात असतो. पालखीचा मुक्काम असताना पहिल्यांदा समाजआरती होते. रात्री कीर्तन, जागर व पहाटे काकड आरती होते. त्यानंतर संस्थान पूजा आणि पाठोपाठ शासकीय पूजा झाल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होते.
तुकोबांची पाऊलखुण
तुकोबारायांची गाथा इंद्रायणी नदीत बुडविल्यानंतर तुकोबाराय ज्या शिळेवर (पाषाण) अनुष्ठानाला बसले होते ती शिळा म्हणजे देहू येथील शिळा होय. त्या ठिकाणी राधाकृष्णाची मूर्ती बसविली आहे. ही शिळा आजही या मंदिरात आहे. भाविक या शिळेवर नतमस्तक होतात. मनुवाद्यांनी तुकोबारायांची गाथा इंद्रायणीत बुडविल्यावर दु:खी-कष्टी होऊन 13 दिवस तुकोबाराय इंद्रायणीकाठी ज्या खडकावर बसून राहिले त्या गाथा पाण्यावर तरंगल्याचे सांगितले जाते. त्यांच्या वंशजांनी तुकाराम महाराजांचा पदस्पर्श झालेली ही शीळा. त्यांची एकमेव पाऊलखुण म्हणून शिळा कापून आणली