Maharashtra monsoon update
पुणे: राज्यात 15 जुलैपर्यंत सर्व भागांत यलो अलर्ट दिला असून, त्यानंतर मात्र पावसाचा जोर पूर्ण ओसरणार आहे. जुलैच्या तिसर्या आठवड्यात राज्यात कमी पावसाचे संकेत आहेत. आगामी तीन दिवस राज्यात पावसाचा जोर राहील. मात्र, त्यानंतर पाऊस कमी होऊन कोकण वगळता सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू राहील. (Latest Pune News)
मोठ्या पावसाचा या काळात खंड राहील. साधारण 22 जुलैपर्यंत हा खंड हवामानशास्त्रज्ञांनी सांगितला आहे. त्यानंतर वातावरण अनुकूल होऊन जुलैच्या तिसर्या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.