पुणे

येरवडा : सौरऊर्जेने झोपड्या प्रकाशमान ! वाढत्या वीजबिलांपासून सुटका

अमृता चौगुले

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : विजेचे दर वाढल्यामुळे गरिबांना वीजबिल भरणे अशक्य झाले आहे. मात्र, युसूफ फाउंडेशनच्या वतीने येरवडा परिसरातील पत्र्याच्या घरात राहणार्‍या झोपडीधारकांना सौरपॅनेलचे वाटप करून झोपडीत प्रकाश तर पाडलाच आहे, शिवाय विजेची बचत देखील होत आहे. युसूफ फाउंडेशन आणि एमराल्ड कन्स्ट्रक्शन्सने आजच्या महागाईच्या काळात वाढते वीज बिल लक्षात घेऊन येरवड्यातील वंचित लोकांना सौरपॅनेल दान करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सौरऊर्जा ही एक मुबलक आणि नूतनीकरणीय संसाधन आहे. या ऊर्जाच्या वापरातून गोरगरीब जनतेचे जीवन सुखकर होऊ शकते. फाउंडेशन या समुदायांला सौरपॅनेल दान केल्यामुळे त्यांना मोफत सौरऊर्जा उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्य आणि जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

व्यवसायाने अभियंते असलेले युसूफ फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद शेख आणि उपाध्यक्ष वझिया शेख यांच्या मते, वंचित घटकांच्या विकासाठी असे उपक्रम राबविणे आवश्यक आहेत. वंचित घटकांसाठी सौरऊर्जा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यातून त्यांच्या विकासाला चालना मिळेल. तसेच पर्यावरणाचे संवर्धन होण्यासदेखील मदत होईल.

कोरोनामुळे आमची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. भरमसाट येणारे विजेचे बिल भरणे शक्य नव्हते. मात्र, युसूफ फाउंडेशनने बसविलेल्या सौरपॅनेलमुळे आमची विजेची व आर्थिक बचत झाली आहे.

                                                – विपुल ढोणे, लाभार्थी, सौरऊर्जा उपक्रम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT