पुणे

पुणे : शस्त्रप्रदर्शनातून महापुरुषांच्या इतिहासाला उजाळा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गवा, गेंड्याच्या कातडीपासून बनवलेल्या ढाली, तलवारी, चिलखत, वाघनखे, कट्यार, दांडपट्टा, ठासणीच्या बंदुका अशी 250 ते 300 वर्षांपूर्वीची 300 हून अधिक शस्त्रे पुणेकरांना पाहायला मिळाली. वीरशिरोमणी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांसह वीर पुरुषांनी त्याकाळी वापरलेल्या शस्त्रांचे महत्त्व समजून घेत, भारताच्या शौर्याच्या इतिहासाला यानिमित्ताने उजाळा देण्यात आला.

समस्त राजपूत समाजाच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या 483 व्या जयंतीनिमित्त बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानात शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाट्न खडक पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक संगीता यादव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अ‍ॅड. प्रताप परदेशी, स्वप्नील नाईक, किशोर रजपूत, गोपी पवार यांसह उपस्थित होते. वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. या वेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहारदेखील अर्पण करण्यात आला. यद्मदत रणजित हजारे, राहुल राठोड, नितीन राठोड यांच्या रॉयल लेगसी ट्रस्ट यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनाला माजी महापौर प्रशांत जगताप, अजय खेडेकर, विजय कुंभार यांसह अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.

SCROLL FOR NEXT