पुणे

Pune : गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक; साठा जप्त

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील चिखली येथे छापा टाकून मामा गॅस सर्विस एजन्सीविरुद्ध गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक, वाहतुकीवर कारवाई अन्न धान्य वितरण विभागाने कारवाई केली आहे. त्यात 35 लाख 73 हजार 545 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली. या कारवाईमध्ये 4 मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले 105 सिलिंडर व रिकामे 602 सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

या कारवाईत आरोपी भिकचंद हिरालाल कात्रे यांच्याविरुद्ध चिखली पोलिस ठाण्यात फसवणूक आणि जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 नुसार तसेच एलपीजी (पुरवठा व वितरण आदेश) आदेश 2000 चे कलम 3 ते 7 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई परिमंडळ अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक स्नेहल गायकवाड आदींनी केली.

SCROLL FOR NEXT