पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई महामार्ग (जुना-नवा) तसेच पुणे-सातारा, पुणे-सोलापूर या महामार्गांवर ट्रक, टँकर या मालवाहतुकीच्या वाहनांमधून सर्रासपणे प्रवाशांची वाहतूक होत असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले आहे. याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असून, अपघात होण्याची शक्यता आहे. मोटार वाहन कायद्यानुसार ज्या वाहनाला प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे. त्याच वाहनातून प्रवासी वाहतूक करणे बंधनकारक आहे. मात्र, वाहनचालक मोटार वाहन कायद्यालाच सर्रास केराची टोपली दाखवून अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करत आहेत. याकडे महामार्ग पोलिस, आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
पुणे-मुंबई नव्या आणि जुन्या महामार्गावर ठिकठिकाणी, सातारा रस्त्यावर, कात्रज बायपासच्या सुरुवातीला, पुणे स्टेशन परिसर, वडगाव पूल, धायरी, बावधन, बालेवाडी, वाकड परिसर, एक्स्प्रेस वेच्या सुरुवातीला, सातार्याच्या दिशेला खेड-शिवापूर, नसरापूर, कापूरव्होळ, सारोळ्यासह ठिकठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे.
केमिकल टँकरमधून अवैधरीत्या प्रवासी वाहतूक होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मागील 10 तारखेलाच आम्ही यासंदर्भात आमच्याकडील अधिकार्यांची बैठका घेतल्या. त्या वेळी अशा पद्धतीने अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणार्यांवर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच, ट्रक, टँकरमधून प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्यांना खाली उतरवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनच्या बसमध्ये बसवून देण्याससुद्धा सांगण्यात आले आहे.
– लता फड, महामार्ग पोलिस अधीक्षक, पुणे विभाग
येथे होते अवैध प्रवासी वाहतूक

हे ही वाचा :