पुणे

खोर : व्हिक्टोरिया तलावातून अवैध मातीउपसा

अमृता चौगुले

खोर; पुढारी वृत्तसेवा : वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावात सध्या 12 टक्के पाणीसाठा राहिला आहे. या तलावातील गाळ उघड्यावर पडला आहे. त्याचा फायदा घेत काही शेतकर्‍यांनी अवैधरीत्या माती उपसा व मातीमिश्रित वाळूउपसा सुरू केला आहे. वरवंड ग्रामस्थांनी शेतकर्‍यांना सदर गाळ उपसा करून तो शेतात टाकण्याचे आवाहन केले होते. यासाठी महसूल विभागाची परवानगी घ्यावी, असे आवाहन वरवंड ग्रामपंचायतीने केले होते.

मात्र, काही शेतकरी महसूल विभागाची परवानगी न घेता राजरोसपणे माती व मातीमिश्रित वाळूउपसा करीत आहेत. व्हिक्टोरिया तलावातील गाळ काढला गेल्यास पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. याबाबत वरवंड ग्रामपंचायत, दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे तलावातून शेतकर्‍यांनी माती व गाळ उपसा करण्याची परवानगी मागितली आहे. सरपंच मीनाक्षी दिवेकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप, सदस्य तानाजी दिवेकर, अशोक फरगडे, पोलिस पाटील किशोर फरगडे यांनी शेतकरीवर्गाला महसूल विभागाची परवानगी मिळाल्यावरच नियमानुसार माती व गाळ उपसा करण्याचे आवाहन केले आहे.

SCROLL FOR NEXT